Close Menu
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube Telegram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Facebook X (Twitter) Instagram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
Home»महाराष्ट्र»शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार सकारात्मक; साखर, कांदा आणि इथेनॉल विषयक निर्णय लवकरच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार सकारात्मक; साखर, कांदा आणि इथेनॉल विषयक निर्णय लवकरच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Lokhitwadimedia24x7@gmail.comBy Lokhitwadimedia24x7@gmail.comMay 28, 2026Updated:May 28, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नवी दिल्ली, दि. २७ : राज्यातील ऊस, साखर आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, केंद्र सरकारकडून लवकरच शेतकरीहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीस केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह राज्यातील विविध मंत्री, लोकप्रतिनिधी आणि सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. तसेच इथेनॉल उत्पादनासाठीचा कोटा वाढवण्याबाबत पुढील दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत. साखर कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठनासाठी राज्य आणि केंद्र सरकार संयुक्तपणे मार्ग काढणार असून व्याज सवलतीची थकबाकीही लवकरच देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘क्वेल प्रायसिंग’ संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे सादर करण्यात येणार असून, त्यामुळे साखर उद्योगातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवरही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. नाफेड आणि एनसीसीएफमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या २ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून १० लाख टनांपर्यंत नेण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.

कांदा बियाण्यांच्या वाढत्या निर्यातीमुळे देशांतर्गत बाजारपेठ प्रभावित होत असल्याने त्यावर ‘एक्सपोर्ट सरचार्ज’ लावण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे. तसेच कांद्याचा खरेदी दर वाढवण्याबाबतही चर्चा झाली असून शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.

नाफेड आणि एनसीसीएफमार्फत होणाऱ्या खरेदीमध्ये ग्रेडिंगच्या नावाखाली माल नाकारला जात असल्याच्या तक्रारींवर उपाय म्हणून आता यांत्रिक पद्धतीने ग्रेडिंग करण्याचा निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली. यामुळे शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक आणि न्याय्य प्रक्रिया मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी आंबा आणि हापूस आंबा उत्पादकांच्या समस्यांबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना निवेदन देण्यात आले. विमा कंपन्यांच्या जाचक अटींमध्ये बदल केल्यास आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळू शकतो, असेही बैठकीत नमूद करण्यात आले. यावर विमा कंपन्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Post Views: 16
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleस्वीकृत आमदार अमितभाई गोरखे यांच्या कार्यालयाजवळ भरधाव कारची पार्किंगमधील गाडीला धडक; चालक फरार
Next Article पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार
Lokhitwadimedia24x7@gmail.com
  • Website

Related Posts

गुन्हेगारी

एमआयडीसी भोसरीतील औद्योगिक मालमत्ता व्यवहारात कोट्यवधींची फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल.

June 18, 2026
आरोग्य

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 7, 2026
महाराष्ट्र

जिद्द, मेहनत आणि देशसेवेच्या ध्यासातून रायपूरच्या दीपक मस्केची भारतीय सैन्यात निवड

June 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

May 29, 202684 Views

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

May 29, 202663 Views

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 7, 2026133 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

May 29, 202684 Views

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

May 29, 202663 Views

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 7, 2026133 Views

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

आमच्याविषयी
आमच्याविषयी

Lokhitwadi Media 24x7 हे एक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकहिताला प्राधान्य देणारे डिजिटल न्यूज व मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह वृत्त आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो.
समाजातील महत्त्वाचे प्रश्न, जनतेचे मुद्दे, राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, गुन्हे, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी बातम्या यावर आम्ही विशेष भर देतो.
आमचे ध्येय म्हणजे “सत्य, पारदर्शकता आणि लोकहित” या मूल्यांवर आधारित पत्रकारिता करत समाजाचा विश्वास संपादन करणे. Lokhitwadi Media 24x7 हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ब्रीदवाक्य: “News • Impact • Trust”

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
©2026 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.