पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पोलीस प्रशासनावर दिवसेंदिवस वाढणारा कामाचा ताण, सततची धावपळ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नेत्रविकारांच्या समस्या लक्षात घेऊन लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने काळेवाडी पोलीस स्टेशन येथे शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष धर्मराज बनसोडे तसेच महाराष्ट्र राज्य सचिव विशाल भाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम पार पडला. शिबिरामध्ये काळेवाडी पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. पोलीस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी विशेष सहकार्य व मोलाचे पाठबळ दिले. तसेच लोकहितवादी सेवा संघाचे महाराष्ट्र मुख्य संघटक अजिंक्य भाऊ वाघमारे आणि निगडी शाखा अध्यक्ष अनिल मुळवाड यांनी उपक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिरासाठी ईशा नेत्रालयाचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी ईशा नेत्रालयाचे मार्केटिंग मॅनेजर यशवंत बोऱ्हाडे, संदेश केंजळे, प्रथमेश पवार, सानिका निकवरे, ब्रांच मॅनेजर दुर्वाक्षी पाटील मॅडम तसेच मेडिकल डायरेक्टर डॉ. वैभव अवताडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत मोलाची भूमिका बजावली.
या उपक्रमामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध झाली असून उपस्थितांनी लोकहितवादी सेवा संघ व ईशा नेत्रालयाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शेवटी लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने सर्व मान्यवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच ईशा नेत्रालयाच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


