Close Menu
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube Telegram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Facebook X (Twitter) Instagram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
Home»गुन्हेगारी»एमआयडीसी भोसरीतील औद्योगिक मालमत्ता व्यवहारात कोट्यवधींची फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल.
गुन्हेगारी

एमआयडीसी भोसरीतील औद्योगिक मालमत्ता व्यवहारात कोट्यवधींची फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल.

Lokhitwadimedia24x7@gmail.comBy Lokhitwadimedia24x7@gmail.comJune 18, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क - 9673653636
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क – 9673653636

भोसरी प्रतिनिधी. दि. १७ जून : एमआयडीसी भोसरी परिसरातील औद्योगिक मालमत्तेच्या तब्बल पाच कोटी रुपयांच्या व्यवहारात फसवणूक, दमदाटी तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप करत दोन जणांविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी छाया मधुकर कोकरे (वय ५०, रा. हनुमाननगर, भगत वस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार हरबनसिंग जब्बल (वय ७७) आणि जसविंदर कौर जब्बल (वय ७४, रा. निगडी प्राधिकरण) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या मालकीची एमआयडीसी भोसरी येथील जे-ब्लॉकमधील १४२८ चौरस मीटर क्षेत्रफळाची औद्योगिक जागा व त्यावरील इमारत वर्ष २०२२ मध्ये पाच कोटी रुपयांना विक्री करण्याचे निश्चित झाले होते. त्यासाठी विसार पावतीही करण्यात आली होती. या व्यवहाराच्या अनुषंगाने फिर्यादींकडून आरोपींना वेळोवेळी तब्बल २ कोटी ४५ लाख रुपयांची रक्कम अदा करण्यात आली होती.

दरम्यान, संबंधित मालमत्ता अन्य व्यक्तीस विक्री करण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याचे समोर आल्यानंतर फिर्यादींना संशय आला. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये नव्याने सहा कोटी रुपयांचा व्यवहार निश्चित करण्यात आला. सप्टेंबर २०२४ मध्ये खरेदी दस्ताची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या व्यवहारासाठी फिर्यादींनी एकूण २ कोटी ९५ लाख ५ हजार रुपये दिल्याचा दावा केला आहे.

फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, उर्वरित रक्कम डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून अदा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आरोपींनी आपले बँक खाते तात्पुरते बंद करून व्यवहार पूर्ण होण्यास अडथळा निर्माण केला. तसेच खरेदीखत पूर्ण करण्यास टाळाटाळ करत फिर्यादी, त्यांचे वकील आणि निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय व्यवहाराबाबत वारंवार विचारणा केल्यावर आरोपींकडून दमदाटी व शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleपिंपरी-चिंचवडमधील ३० सरकारी शाळा टाटा, बजाज, बिसलेरी कंपन्यांना दत्तक; ‘वारे गुरुजी’ यांच्या संकल्पनेतून शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन.
Next Article हिंजवडी पोलिसांची मोठी कारवाई; ६० ग्रॅम ब्राऊन शुगरसह आरोपी जेरबंद.
Lokhitwadimedia24x7@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे

मोशी कचरा डेपो दुर्घटना : चौथ्या दिवशीही बचावकार्य युद्धपातळीवर; मॅन्युअल सर्च ऑपरेशनला सुरुवात

July 11, 2026
पिंपरी चिंचवड

मुसळधार पावसात रेखाताई काटे ठरल्या नागरिकांचा आधार; मदतकार्याबरोबरच साड्यांचे वाटप.

July 7, 2026
शैक्षणिक

वडिलांच्या कष्टाचे चीज; ऋतुजा पोपट आरणे हिचे एमपीएससी-यूपीएससीचे स्वप्न.

July 6, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

May 29, 202684 Views

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

May 29, 202663 Views

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 7, 2026133 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

May 29, 202684 Views

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

May 29, 202663 Views

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 7, 2026133 Views

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

आमच्याविषयी
आमच्याविषयी

Lokhitwadi Media 24x7 हे एक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकहिताला प्राधान्य देणारे डिजिटल न्यूज व मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह वृत्त आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो.
समाजातील महत्त्वाचे प्रश्न, जनतेचे मुद्दे, राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, गुन्हे, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी बातम्या यावर आम्ही विशेष भर देतो.
आमचे ध्येय म्हणजे “सत्य, पारदर्शकता आणि लोकहित” या मूल्यांवर आधारित पत्रकारिता करत समाजाचा विश्वास संपादन करणे. Lokhitwadi Media 24x7 हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ब्रीदवाक्य: “News • Impact • Trust”

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
©2026 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.