Close Menu
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube Telegram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Facebook X (Twitter) Instagram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
पुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी

Lokhitwadimedia24x7@gmail.comBy Lokhitwadimedia24x7@gmail.comMay 23, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शस्त्रे, मिरवणुका, भडकावू घोषणा आणि सभा यांवर निर्बंध

पुणे : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ३७ (१) व (३) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी हा आदेश जारी केला असून तो २७ मे २०२६ रोजी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. सदर आदेश ९ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे.

या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध निर्बंध लागू करण्यात आले असून नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आदेशानुसार तलवारी, भाले, काठ्या, दंड, बंदुका तसेच दगडफेक किंवा हल्ल्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. दाहक पदार्थ, स्फोटके किंवा शारीरिक इजा पोहोचवू शकणारी साधने घेऊन फिरण्यासही मनाई करण्यात आली आहे.

तसेच पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे, पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी न घेता सभा आयोजित करणे किंवा मिरवणुका काढणे यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात घोषणा देणे, वाद्य वाजवणे किंवा भडकावू भाषणे करणे यांनाही मनाई करण्यात आली आहे.

शहरातील शांतता आणि सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक पुतळे, चित्रे किंवा प्रतिमांचे प्रदर्शन अथवा दहन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच समाजात तणाव निर्माण होईल, द्वेष पसरवला जाईल किंवा राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे प्रचार साहित्य, संदेश किंवा वक्तव्ये प्रसारित करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

दरम्यान, शासन सेवेत कार्यरत अधिकारी तसेच अधिकृत कर्तव्यासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी असलेल्या व्यक्तींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. कायदेशीर मान्यता प्राप्त सुरक्षा यंत्रणांनाही या नियमांचा अपवाद लागू राहणार आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

शहरातील शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक वातावरण अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 37
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Article२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला
Next Article पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन
Lokhitwadimedia24x7@gmail.com
  • Website

Related Posts

राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन.

October 8, 2026
पिंपरी चिंचवड

वाकडच्या अंडरपासमध्ये टेम्पोची कॉलमला धडक; टपावर बसलेल्या तरुणाचा मृत्यू

October 7, 2026
पुणे

प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांनीच नातवावर झाडली गोळी; लोणावळ्यात शिवसेना नेत्याच्या मुलाची हत्या, 5 जणांवर पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा

October 7, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला

May 22, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी

May 23, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन

May 23, 2026
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला

May 22, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी

May 23, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन

May 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

आमच्याविषयी
आमच्याविषयी

Lokhitwadi Media 24x7 हे एक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकहिताला प्राधान्य देणारे डिजिटल न्यूज व मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह वृत्त आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो.
समाजातील महत्त्वाचे प्रश्न, जनतेचे मुद्दे, राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, गुन्हे, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी बातम्या यावर आम्ही विशेष भर देतो.
आमचे ध्येय म्हणजे “सत्य, पारदर्शकता आणि लोकहित” या मूल्यांवर आधारित पत्रकारिता करत समाजाचा विश्वास संपादन करणे. Lokhitwadi Media 24x7 हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ब्रीदवाक्य: “News • Impact • Trust”

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
©2026 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.