Close Menu
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube Telegram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Facebook X (Twitter) Instagram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
पुणे

२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला

Lokhitwadimedia24x7@gmail.comBy Lokhitwadimedia24x7@gmail.comMay 22, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात एकतर्फी प्रेमातून झालेल्या संतापजनक हल्ल्याने शहर हादरले आहे. २१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीराम मधु सरनवर (वय २०) याला पुणे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत कर्नाटकातून अटक केली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पीडित तरुणी आणि तिचा मित्र पुण्यातील एका हॉटेलमध्ये एकत्र काम करत असून ताडीवाला रोड परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तरुणीने आपल्यासोबत न राहता दुसऱ्या तरुणासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने आरोपीच्या मनात तीव्र राग निर्माण झाला होता.

२० मे रोजी पहाटे सुमारे दोनच्या सुमारास, काम आटोपून दोघे पायी घरी जात असताना आरोपीने ताडीवाला रोड परिसरात त्यांचा पाठलाग करत त्यांना अडवले. सुरुवातीला वाद घालत आरोपीने अचानक आपल्या जवळील तीव्र रासायनिक पदार्थ तरुणीच्या अंगावर फेकला. या भीषण हल्ल्यात तरुणीच्या मानेवर, पाठीवर आणि दोन्ही पायांवर गंभीर भाजल्याच्या जखमा झाल्या. तिच्या मित्रालाही दुखापत झाली असून त्याच्या पायाला इजा झाल्याचे समोर आले आहे.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे गुन्हे शाखा आणि बंडगार्डन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांच्या विशेष पथकाने कर्नाटक रेल्वे पोलिसांच्या मदतीने हुबळी रेल्वे स्थानकावर सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले.

या घटनेमुळे पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Post Views: 37
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleआषाढीवारी पालखी सोहळा मार्ग तसेच विसावा ठिकाणांची आयुक्त यांनी केली पाहणी
Next Article पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी
Lokhitwadimedia24x7@gmail.com
  • Website

Related Posts

राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन.

October 8, 2026
पिंपरी चिंचवड

वाकडच्या अंडरपासमध्ये टेम्पोची कॉलमला धडक; टपावर बसलेल्या तरुणाचा मृत्यू

October 7, 2026
पुणे

प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांनीच नातवावर झाडली गोळी; लोणावळ्यात शिवसेना नेत्याच्या मुलाची हत्या, 5 जणांवर पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा

October 7, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला

May 22, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी

May 23, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन

May 23, 2026
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला

May 22, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी

May 23, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन

May 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

आमच्याविषयी
आमच्याविषयी

Lokhitwadi Media 24x7 हे एक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकहिताला प्राधान्य देणारे डिजिटल न्यूज व मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह वृत्त आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो.
समाजातील महत्त्वाचे प्रश्न, जनतेचे मुद्दे, राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, गुन्हे, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी बातम्या यावर आम्ही विशेष भर देतो.
आमचे ध्येय म्हणजे “सत्य, पारदर्शकता आणि लोकहित” या मूल्यांवर आधारित पत्रकारिता करत समाजाचा विश्वास संपादन करणे. Lokhitwadi Media 24x7 हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ब्रीदवाक्य: “News • Impact • Trust”

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
©2026 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.