पुणे प्रतिनिधी
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत इंधन दरांमध्ये वारंवार वाढ होत असून, अवघ्या दहा दिवसांत चौथ्यांदा दरवाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 
ताज्या दरवाढीनुसार पेट्रोल प्रति लिटर ₹२.६१ तर डिझेल ₹२.७१ ने महागले आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढून त्याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध, किराणा तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयाची घसरण आणि जागतिक तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन दर वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. काही भागांत इंधन टंचाईच्या चर्चेमुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचेही चित्र दिसून आले. 
दरम्यान, वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडत असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. इंधन दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क – 9673653636 लोकहितवादी मीडिया 24×7


