Close Menu
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube Telegram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Facebook X (Twitter) Instagram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
पिंपरी चिंचवड

आषाढीवारी पालखी सोहळा मार्ग तसेच विसावा ठिकाणांची आयुक्त यांनी केली पाहणी

Lokhitwadimedia24x7@gmail.comBy Lokhitwadimedia24x7@gmail.comMay 22, 2026No Comments4 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या दिल्या सूचना

पिंपरी, दि. २२ मे २०२६ – आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. वारकऱ्यांचा मुक्काम, विसावा तसेच पालखी मार्गावरील ठिकाणी सर्व यंत्रणांनी आवश्यक सोयीसुविधांचे प्रभावी नियोजन करावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड न करता पोलीस प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन येत्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळांची तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाच्या ठिकाणांची पाहणी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली, त्यावेळी सूचना देताना ते बोलत होते.

या पाहणी दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सुरूवातीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे महापालिकेच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाबाबतच्या कामकाजाबाबत पाहणी करून माहिती घेतली. यावेळी माहिती देण्यासाठी उप आयुक्त प्रदीप ठेंगल, अतुल पाटील, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, कार्यकारी अभियंता अनिल सुर्यवंशी, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश नांदुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निता गायकवाड आदी उपस्थित होते.

यानंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आकुर्डी येथील खंडोबा माळ चौक, विठ्ठल मंदिर परिसर आणि मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू माध्यमिक विद्यालय येथील पालखी विसावा ठिकाणांची पाहणी केली. यावेळी माहिती देण्यासाठी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, कार्यकारी अभियंता वैशाली ननवरे आदी उपस्थित होते.

आकुर्डी येथील विसावा ठिकाणांची पाहणी केल्यानंतर आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी खराळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नाशिक फाटा रोड, दापोडी येथील पालखी विसावा आदी ठिकाणांचीही पाहणी केली व तेथे पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी माहिती देण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे, कार्यकारी अभियंता उमेश मोने, पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील आदी उपस्थित होते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मोशी येथील मॅगझिन चौक येथे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात येते. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाबाबतची देखील माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी करून घेतली. यावेळी माहिती देण्यासाठी कार्यकारी अभियंता परशुराम वाघमोडे, शिवराज वाडकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, वडमुखवाडी येथील थोरल्या पादूका मंदिर या विसावा ठिकाणासही भेट देऊन तेथे देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

*पाहणीदरम्यान पालखी मार्ग, मुक्काम स्थळे आणि सुरक्षिततेबाबत आयुक्तांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना*

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवा-सुविधांचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात यावे. कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता घेऊन सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून काम करावे, अशा सूचना आयुक्तांनी पाहणी दौऱ्यावेळी दिल्या.

पालखी सोहळा पावसाळ्याच्या कालावधीत होत असल्याने आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा सतर्क व सज्ज ठेवण्यात यावी. शहरातील सर्व होर्डिंग्जची पाहणी करून धोकादायक अथवा नियमबाह्य होर्डिंग्जवर तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच पालखी मार्ग, मुक्काम स्थळे, विसावा ठिकाणे आणि पार्किंग परिसरात दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत. वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी स्वतंत्र समन्वयकांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या. वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. तातडीच्या वैद्यकीय सुविधांसाठी महापालिकेच्या वतीने रुग्णवाहिका, फिरता दवाखाना तसेच महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये २४ तास मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. पालखी मुक्काम स्थळे, वारकरी निवास तसेच पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही साचणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात यावी. यासाठी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पाणी निचरा व्यवस्था आणि रस्त्यांची नियमित पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी. पालखी मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते सुरक्षित व सुस्थितीत ठेवावेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्थेसंदर्भातील फलक तसेच महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देणारे फलक लावण्यात यावेत. तसेच प्रत्येक मुक्काम स्थळी स्वतंत्र कंट्रोल रूम उभारण्यात यावा, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या. वारकऱ्यांच्या मुक्काम, विसावा आणि कार्यक्रम स्थळांवर स्वच्छता, साफसफाई आणि जंतुनाशक फवारणी नियमित करण्यात यावी. पालखी मार्गावरील तसेच परिसरातील राडारोडा, बांधकाम साहित्य आणि अडथळे तात्काळ हटवावेत. अग्निशमन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेऊन सर्व यंत्रणा कार्यरत ठेवण्यात यावी. तसेच पालखी मार्ग, स्वागत कक्ष, मुक्काम आणि विसावा स्थळांवरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुरू असून ते सुस्थितीत कार्यरत असल्याची खातरजमा संबंधित विभागांनी करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Post Views: 24
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Next Article २१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला
Lokhitwadimedia24x7@gmail.com
  • Website

Related Posts

राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन.

October 8, 2026
पिंपरी चिंचवड

वाकडच्या अंडरपासमध्ये टेम्पोची कॉलमला धडक; टपावर बसलेल्या तरुणाचा मृत्यू

October 7, 2026
पुणे

प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांनीच नातवावर झाडली गोळी; लोणावळ्यात शिवसेना नेत्याच्या मुलाची हत्या, 5 जणांवर पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा

October 7, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला

May 22, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी

May 23, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन

May 23, 2026
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला

May 22, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी

May 23, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन

May 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

आमच्याविषयी
आमच्याविषयी

Lokhitwadi Media 24x7 हे एक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकहिताला प्राधान्य देणारे डिजिटल न्यूज व मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह वृत्त आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो.
समाजातील महत्त्वाचे प्रश्न, जनतेचे मुद्दे, राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, गुन्हे, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी बातम्या यावर आम्ही विशेष भर देतो.
आमचे ध्येय म्हणजे “सत्य, पारदर्शकता आणि लोकहित” या मूल्यांवर आधारित पत्रकारिता करत समाजाचा विश्वास संपादन करणे. Lokhitwadi Media 24x7 हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ब्रीदवाक्य: “News • Impact • Trust”

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
©2026 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.